मनोरंजन : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील Maratha protester Manoj Jarange Patil यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट ‘आम्ही जरांगे’ गरजवंत मराठ्यांचा लढा! येत्या 14 जूनला चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे. मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अभिनेता मकरंद देशपांडे Makrand Deshpande यांनी साकारली आहे त्यांचा खास लूक पहाचं…
https://www.instagram.com/reel/C73Q0V3NPYT/?igsh=NW12aG9qamd3Z2w0
नारायणा प्रोडक्शन यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की अभिनेता मकरंद देशपांडे यांचा मनोज जरांगे पाटील यांच्याशी मिळताजुळता चेहरा कसा घडवला जातो आहे.


अर्थातच ही कमाल मेकअप आर्टिस्टची आहे. परंतु हा व्हिडिओ नक्कीच अचंभित करणारा असल्याने सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.


मनोज जरांगे पाटील यांना अनेकांनी त्यांच्या आंदोलनामुळे ओळखले असेल पण खरंतर जरांगे पाटील यांनी आपला मराठा आरक्षणासाठी चा लढा अनेक वर्षांपासून दिला आहे. आज पर्यंत त्यांनी आयुष्यात मराठा आरक्षण मिळवण्यासाठी केलेली धडपड, आमरण उपोषण, पदयात्रा, आंदोलन या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

येत्या 14 जूनला हा चित्रपट पाहण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक तर उत्सुक आहेतच परंतु सामान्य माणसाच्या मनामध्ये देखील जरांगे पाटील यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
