मुंबई : 14 जून 2020 साली एक अत्यंत धक्कादायक घटना देशाने पाहिली आहे. गुणी आणि प्रसिद्ध अशा अभिनेत्याने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. चार वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत Sushant Singh Rajput याने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
आज देखील सुशांतने नेमकी आत्महत्या का केली ? याचं कारण उलगडू शकलं नाही. सुशांतच्या स्मृतिदिनानिमित्ताने त्याच्या चाहत्यांनी आणि बॉलीवूड मधल्या अनेकांनी त्याला श्रद्धांजली अर्पित केली आहे. यावेळी सुशांतच्या बहिणीने देखील इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट केली आहे.
https://www.instagram.com/p/C8LdUDsyw4r/?utm_source=ig_web_copy_link
सुशांतच्या बहिणीने एक जुना व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये सुशांत त्याच्या बहिणी सोबत दिसून येतो आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सुशांतची बहिण श्वेता हिने आपल्या भावनांना शब्दात व्यक्त करताना म्हटले आहे की, ” तू आम्हाला सोडून चार वर्षे झाली आहेत आणि 14 जून 2020 रोजी काय झालं हे अद्याप आम्हाला माहित नाही. तुझा मृत्यू एक गुड राहिला आहे. सत्यासाठी मी अधिकाऱ्यांना असंख्य वेळा आवाहन केलं आहे.
मी माझा संयम गमावत आहे आणि आता मी हळूहळू हार मानत आहे. मला या प्रकरणात मदत करू शकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विचारायचे आहे. तुमच्या हृदयावर हात ठेवा आणि स्वतःला विचारा सुशांतचे काय झाले आहे. हे जाणून घेण्याची आमची लायकी नाही का ? हा राजकीय अजेंडा का बनला आहे ? काय सापडले आणि त्या दिवशी काय घडले ? असे मानले जाते हे सांगण्याइतके सोपे का असू शकत नाही. मी भीक मागत आहे. आम्हाला एक कुटुंब समजा आणि आम्हाला पुढे जाण्यास मदत करा. ” असं श्वेता यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
https://www.instagram.com/p/C8Lg6CcyvcH/?utm_source=ig_web_copy_link
तर बॉलीवूड मधून अंकिता लोखंडे हिने देखील सुशांतचा फोटो शेअर करून त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
त्याचबरोबर खतरो के खिलाडी 14 फेम अभिषेक कुमार याने देखील पोस्ट करून, ” तुला आजही कोणी विसरू शकत नाही !” अशा शब्दात सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.