नवी दिल्ली : आजची एक मोठी बातमी समोर येते आहे. सध्या देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. रोजच अगदी देशभरातून राजकारणातल्या वेगवेगळ्या बातम्या येत असतात. अशातच आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कामकाजावर संशय आहे म्हणून इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ उद्या थेट राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू President Draupadi Murmu यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते आहे.
नेमकं प्रकरण काय
यंदा देशभरात पाच टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडते आहे. यातील आत्तापर्यंत तीन टप्पे पार पडले आहेत. दरम्यान पहिला टप्पा 19 एप्रिलला पार पडला. ज्यामध्ये 60% सरासरी मतदान झालं. असं निवडणूक आयोगाने सांगितले होते. त्यानंतर दुसरा टप्पा 26 एप्रिलला पार पडला यामध्ये 61% मतदान झाले अशी माहिती निवडणूक आयोगाने कळवली. परंतु पुन्हा 30 एप्रिलला एकूण 66 टक्के मतदान झाल्याची सुधारित आकडेवारी निवडणूक आयोगाने दिल्याने इंडिया आघाडीच्या नेत्यांनी संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी देखील निवडणूक आयोगाला पत्र लिहून स्पष्टीकरण मागितले आहे.
दरम्यान आता इंडिया आघाडीचा शिष्टमंडळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन निवडणूक आयोगाच्या कामावर असलेल्या संशयाबाबत चर्चा करणार आहे.