पुणे : महाराष्ट्र काँग्रेस करून राज्यसभेसाठी चंद्रकांत हंडोरे Chandrakant Handore यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या वतीने राज्यसभा Rajya Sabha Elections उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्र काँग्रेस कडून चंद्रकांत हांडोरे Chandrakant Handore यांचे अधिकृतरित्या नाव जाहीर करण्यात आल आहे. आज चंद्रकांत हंडोरे यांनी दिल्लीमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेऊन पक्षाचे आभार व्यक्त केले.

एकीकडे पुण्यात चंद्रकांत हंडोरे यांच्यावर खासदारपदी बिनविरोध निवडून गेल्याबद्दल कार्यकर्ते बॅनर लावून शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. भीम शक्ती संघटनेचे सचिव विजय हिंगे यांनी हे बॅनर लावले आहेत.

विशेष म्हणजे सोनिया गांधी यांनी देखील यावेळी राज्यसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला असून सोनिया गांधी या राजस्थान मधून निवडणूक लढवणार आहेत. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या वतीने राज्यसभेसाठी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार बिहार मधून अखिलेश सिंह हे निवडणूक लढवणार आहेत. त्याचबरोबर हिमाचल प्रदेश मधून अभिषेक म्हणून सिंघवी आणि महाराष्ट्रातून चंद्रकांत हांडोरे ही चार नावं जाहीर करण्यात आली आहेत.

गेल्या राज्यसभा निवडणुकीमध्ये देखील काँग्रेसच्या वतीने चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु राज्यसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान पुन्हा एकदा काँग्रेसने चंद्रकांत हांडोरे यांच्यावर विश्वास दाखवला आहे.