मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस NCP अजित पवार गटाची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीला पक्षाचे सर्वच प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान ज्येष्ठ नेते छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार Deputy Chief Minister Ajit Pawar यांच्याकडे येत्या विधानसभा निवडणुकीबाबत महत्त्वाचा मुद्दा स्पष्टच केला आहे.
आजच्या या बैठकीमध्ये छगन भुजबळ म्हणाले की, ” लोकसभेसारखी विधानसभेला जागा वाटपात खटपट होता कामा नये, असं छगन भुजबळ म्हणाले. आपण महायुतीमध्ये आलो, तेव्हा त्यांनी 80-90 जागा देण्याचा शब्द दिलेला. विधानसभेला महायुतीमध्ये योग्य वाटा मिळाला पाहिजे. लोकसभेसारखी विधानसभेला खटपट नको, आम्हाला एवढ्या जागा हव्या हे त्यांना सांगाव लागेल. 80-90 जागा मिळाल्या, तर 50-60 निवडून येणार. तुमचे 50 आहेत, मग 50 घ्या, असं होता कामा नये. त्यामुळे आताच सांगून टाका आमचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे” असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.
काका पुतण्यात पुन्हा शाब्दिक चकमक ! 2004 च्या घटनेबाबत शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांचे गंभीर आरोप म्हणाले, ‘ शरद पवार धादांत खोटं बोलत आहेत! ‘नेमकं प्रकरण काय ?
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये जागा वाटपावरून मोठा गदारोळ झाला आहे. लोकसभेच्या यंदाच्या पाचही टप्प्यातल्या मतदान प्रक्रियेला आता पूर्णविराम मिळाला आहे. तर आता संपूर्ण महाराष्ट्राचा लक्ष 4 जूनच्या निकालाकडे लागले आहे. दरम्यान महाराष्ट्रात पुढच्या काही दिवसात विधानसभा निवडणुका घोषित होऊ शकतात. राजकीय सूत्रांनी दिलेल्या अंदाजानुसार येत्या ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर होऊ शकते. यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक घेतली आहे. लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या यावरून नाराजीचा सूर उमटत असतानाच आता पुन्हा जागावाटपावरून वाद नको म्हणून छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.