तामिळनाडू : प्रेम ही अशी भावना आहे जी कोणावरही होऊ शकते. आजकाल प्रेमाविषयी सर्वच जण मोकळेपणाने बोलत आहेत. त्यामुळे प्रेम हे लिंग ,जात ,पैसा, धर्म, काळा, गोरा असा कोणताही भेद मानत नाही हेच स्पष्ट होतं. पण जेव्हा प्रेमात अखंड बुडाल्या नंतर कोणत्याही कारणाने ती व्यक्ती दूर जाणार ही भीती देखील एक क्रूर आरोपीला जन्म देते.
तमिळनाडूतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. त्या दोघीजणी शाळेतील मैत्रिणी होत्या. पीडिता आणि पांडी माहेश्वरी या दोघीजणींचं नातं मैत्रीचं राहिलं नव्हतं. दोघींनीही लग्न करण्यासाठी ठरवलं. यासाठी पांडी माहेश्वरी हिने लिंग बदल शस्त्रक्रिया देखील करून घेतली आणि ती वेत्रीमणी झाली.
वेत्रीमनी तिच्यासाठी आयुष्यातला खूप मोठा निर्णय घेतला होता. पण जेव्हा लग्न करण्याची वेळ आली त्यावेळी ऐनवेळी नंदिनीने नकार दिला.नंदिनीच्या या वागणुकीचा आणि नकार पचवता न आल्याने वेत्रीमनीने तिचे हात पाय बांधून तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. वेत्रीमनी फरार झाला असून त्याचा शोध घेतला जातो आहे.