मुंबई : आज लोकसभा निवडणुकीचे जवळपास सर्वच निकाल हाती आले आहेत. आजचा निकाल हा काही प्रमाणात अनपेक्षित होता तो भाजपसाठी… महायुतीला अपेक्षित अशा काही जागा देखील भाजपने BJP गमावल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट ओसरली का? असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होते आहे. पण दुसरीकडे ज्या लोकसभा मतदारसंघांमध्ये स्वतः राज ठाकरे Raj Thackeray यांनी उपस्थित राहून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला त्या सर्व मतदारसंघांमधून उमेदवार निवडून आले आहे.
मनसेनं या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बिन शर्त पाठिंबा दिला होता. यावरून पक्षात अंतर्गत कुरबुरीत देखील झाल्या पण नेहमीप्रमाणे राज ठाकरे आपल्या निर्णयावर आणि मतावर ठाम होते. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून नारायण राणे, कल्याण डोंबिवली मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे, पुण्यामधून मुरलीधर मोहोळ आणि ठाण्यातून नरेश मस्के यांच्यासाठी सभा घेतल्या हे सर्व उमेदवार निवडून आले आहेत.
विशेष म्हणजे ज्या उमेदवारांसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये ठराविक लोकसभा मतदारसंघांमध्ये उपस्थित राहून प्रचार केला त्या मतदार संघांपैकी अहमदनगर, धाराशिव, अमरावती हे मतदार संघ भाजपच्या हातून निसटले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी अगदी लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यांमध्ये भाजप आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचं मान्य केलं आणि उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा देखील घेतल्या अशा या सर्व मतदारसंघांमध्ये उमेदवारांनी मुसंडी मारली आहे.