• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, August 31, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Shahu Maharaj : सवर्णांनी मारहाण केली म्हणुन महाराजांनी गंगाराम कांबळेला हॉटेल काढून दिलं…

Web Team by Web Team
June 26, 2023
in महाराष्ट्र
0
Shahu maharaj Gangaram Kamble hotel

फोटो सौजन्य : डॉ.बा.आं.म.वि.नाट्यगृह

295
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सामाजिक न्याय दिवस म्हणून पाळला जाणारा २६ जून हा दिवस म्हणजेच राजर्षी शाहू महाराज यांची जयंती (Shahu Maharaj Birth Anniversary). शाहू महाराज यांनी नेहमीच अन्यायाच्या विरुद्ध केवळ आवाज उठवला नाही तर प्रत्यक्ष कृती केल्याचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. जातीभेदाबद्दल शाहू महाराजांना प्रचंड राग होता हे या घटनांवरुन आपल्या लक्षात येते. त्यापैकीच एक म्हणजे, कोल्हापूरातील गंगाराम कांबळे यांच्या हॉटेलचा किस्सा.

मराठ्यांचा हौद बाटवला म्हणुन मारहाण

कोल्हापुरातील बावडा बंगल्यात सरकारी पागेत गंगाराम कांबळे नावाचा एक मोतद्दार होता. या पागेत महार मोतद्दारची संख्या मोठ्या प्रमाणात होती. घोड्याची निगा राखणे हे त्यांचे काम होते.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

एक दिवस दुपारच्या वेळी पागेतील सर्वजण जेवणासाठी डब्बा उघडून बसले. मात्र त्यादिवशी हौदात पाणीच नव्हतं. बिना पाण्याचं जेवण कस करावं? असा प्रश्न त्यांना पडला. या लोकांना पाण्यासाठी हौदात नळ पण सोडता येत नसायचा, असं केल्यास उच्चवर्णीय लोक आपल्याला दंड देतील या विचाराने सगळे महार शांत बसले होते.

मात्र कितीवेळ असंच बसायचं म्हणून त्यांच्यातील गंगाराम कांबळे याने हिम्मत करून हौदात नळ सोडले. हे कळताच एक मराठा शिपही आणि इतर काही मराठा नोकरांनी मिळून गंगारामला हौद बाटवला म्हणून चाबकाने, लाथा-बुक्यांनी मारहाण केली. शाहू महाराज नेमकं त्या दिवशी कोल्हापुरात नव्हते.

शाहू महाराज कोल्हापुरात परत आल्यानंतर गंगाराम त्याच्या सहकाऱ्यांना घेऊन महाराजांकडे गेला. महाराजांना पाठीवरचे चाबकाचे वळ दाखवत सगळी कहाणी सांगितली. महाराजांना घडलेला प्रकार ऐकून प्रचंड राग आला. त्यांनी मारहाण करणाऱ्यांना तातडीने बोलावणं धाडलं. गंगारामला जशी मारहाण करण्यात आली होती त्याचप्रकारे या शिपायाला देखील फटके देण्यात आले.

या घटनेनंतर महाराजांनी विहीरी हौद अशा जागा सर्वधर्मियांसाठी खुल्या केल्या. ‘सरकारी कॅम्पमध्ये कुठल्याही जलस्त्रोतावर पाणी घेण्याचा अधिकार सर्वांना असेल. एखाद्या व्यक्तीला रोखण्याचा किंवा दंड करण्याचा अधिकार कुणालाही नाही आणि तसे केल्यास त्या व्यक्तीला दंड केला जाईल’, असा नियम काढला.

या सर्व प्रकारानंतर गंगारामला शिक्षा देणाऱ्यांमध्ये प्रचंड रोष होता. महाराजांनी गंगाराम समोरच दंड दिल्याचा राग त्यांच्या मनात होता. महाराजांनी त्यांच्या इन्फन्ट्रीमधील किसन नावाच्या एका कोचमनला त्याच्या कामावर खूश होऊन जरीचा पटका आणि रोख रक्कम बक्षीस दिली होती. हे पैसे चोरीला गेले आणि त्याचा आळ गंगारामवर घेतला गेला. गंगारामला बेदम मारहाण करण्यात आली. “हौद बाटवतो, आमचं नाव महाराजांना सांगतो”, असं मारणाऱ्यांच्या तोंडून ऐकल्यावर गंगारामला खऱ्या प्रकाराचा अंदाज आला.

गंगारामने महाराजांसमोर जाऊन पुन्हा आपल्यासोबत घडलेली घटना ऐकवली. शरीरावरील जखमा दाखवल्या. यावेळी महाराजांना त्याचे हाल बघवले नाही. त्यांनी गंगारामला जवळ बोलवून पाठीवरुन हात फिरवला. महाराजांनी गंगारामला चाकरीतून मुक्त केलं. त्याला स्वतंत्र व्यवसाय चालू करायला सांगितला आणि स्वतः मदत करणार असल्याचं आश्वासन दिलं.

‘सत्यसुधारक हॉटेल’ची सुरुवात

या घटनेनंतर कोल्हापूरच्या भाऊसिंग रोडला ‘सत्यसुधारक हॉटेल’ या नावाने गंगारामने महाराजांच्या म्हणण्यानुसार चहाचं दुकान थाटलं. या दुकानात चांगली साफसफाई गंगाराम ठेवत असे. पण ह़ॉटेल महाराचं आहे हे कळताच लोकं तिथून बाहेर पाडायची.

महाराजांच्या कानावर हा प्रकार आल्यानंतर त्यांनी एक दिवस थेट गंगारामाच्या दुकानाबाहेर घोडागाडी आणली आणि चहाची ऑर्डर दिली. महाराज स्वतः तर चहा प्यायलेच तसेच सोबत असलेल्या उच्चवर्णियांना देखील महाराच्या हॉटेलमधला चहा प्यायला सांगितला. शाहू महाराजांच्या आग्रहाखातर सवर्णांना देखील गंगारामच्या हातचा चहा प्यावा लागायचा. त्यानंतर अनेकदा महाराज गंगारामच्या हॉटेलसमोर येऊन गाडी थांबवायचे आणि चहा घ्यायचे.

इतकंच नाही तर महाराजांनी गंगारामला हेडमास्तरची नोकरी दिली. लिहिती वाचता न येणाऱ्या गंगारामला आयुष्यभर पगार मिळेल याची सोय महाराजांनी केली. नंतरच्या काळात महाराजांनी गंगारामला समाज प्रबोधनाच्या कामाला लावलं.

याच गंगाराम कांबळे यांच्या पुढाकाराने १९२५ ला शाहू महाराजांचे जगातील पहिले स्मारक दलित समाजाने कोल्हापुरात उभारले.

Previous Post

Treking Places Near Pune : Treking Lovers साठी पुण्याजवळची 5 लोकप्रिय ठिकाणं

Next Post

Shantabai Kopargaonkar : एकेकाळी तमाशाचा फड गाजवणाऱ्या शांताबाईंची खरी कहाणी

Next Post
shantabai Kopargaonkar life story

Shantabai Kopargaonkar : एकेकाळी तमाशाचा फड गाजवणाऱ्या शांताबाईंची खरी कहाणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

#PUNE : येरवडा, हवेली औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये स्थानिक उद्योगांसाठी उपयुक्त ठरणारे अभ्यासक्रम सुरू करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

#PUNE : येरवडा, हवेली औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये स्थानिक उद्योगांसाठी उपयुक्त ठरणारे अभ्यासक्रम सुरू करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

3 years ago
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची पहिली बैठक संपन्न; “48 जागा निवडून आणू..!” संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची पहिली बैठक संपन्न; “48 जागा निवडून आणू..!” संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

3 years ago
Maharashtra Landslide

Maharashtra Landslide : रायगडमध्ये दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू, 120 लोक अडकल्याची भीती; मुख्यमंत्री शिंदे पोहोचले घटनास्थळी

3 years ago
Vasai-Virar

Vasai-Virar : पालघर जिल्ह्यात फिरतोय सीरियल रेपिस्ट; मुलींना व पालकांना सतर्क राहण्याचा इशारा

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Shahu Maharaj : सवर्णांनी मारहाण केली म्हणुन महाराजांनी गंगाराम कांबळेला हॉटेल काढून दिलं…

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.