नवी दिल्ली : बॉलीवूड BOLLYWOOD मधील अनेक कलाकार चित्रपटांसह वेगवेगळ्या जाहिरातींमध्ये Advertisement देखील दिसत असतात. यासाठी ते लाखो करोडो रुपयांचे मानधन देखील घेत असतात. विशेष करून बॉलीवूडमधील काही खास कलाकारांना त्यांचे चाहते मोठ्या प्रमाणावर फॉलो करत असतात. अर्थात त्यांचे राहणीमान, कपडे, शूज किंवा दिसण्याची स्टाईल अगदी जशीच्या तशी कॉपी करण्याची देखील या चहात्यामध्ये ओढ असते. अशातच आपण नेमके जाहिरातींच्या माध्यमातून चुकीचा संदेश तर देत नाही ना ? हा विचार या कलाकारांनी देखील करायला हवा आहे. परंतु आता अविचाराने पान मसाल्याची जाहिरात करणारे शाहरुख खान, अजय देवगन आणि अक्षय कुमार या तिघा जणांना संकटाचा सामना करावा लागणार आहे.
बॉलीवूड अभिनेते शाहरुख खान Shah Rukh Khan, अक्षय कुमार Akshay Kumar आणि अजय देवगन Ajay Devgan या तिघा जणांना पान मसाल्याची जाहिरात केल्याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने केलेल्या अवमान याचिकेवर केंद्र सरकारने कारवाई करून या तिघा जणांना नोटीस बजावली आहे.
याप्रकरणी केंद्र सरकारच्या आदेशानुसार उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून 9 मे 2024 ला सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती राजेश सिंह चव्हाण यांच्या खंडपीठाने आदेश दिले आहेत.