छत्तीसगड : छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री Chhattisgarh CM Vishnudev Sai निवडण्यासाठी शनिवारी भाजप BJP विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. विष्णुदेव साई यांची छत्तीसगडच्या नव्या मुख्यमंत्री पदी वर्णी लागली आहे. कुणकुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विष्णूदेव साई हे आदिवासी समाजाचे आहेत. विष्णुदेव साईंचे नाव सर्वांना चकीत करणारे होते, कारण विष्णुदेव साई यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नव्हते.
केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, सर्बानंद सोनोवाल आणि दुष्यंत कुमार गौतम यांच्यासह ओम माथुर आणि मनसुख मांडविया हे भाजपचे तीन पर्यवेक्षक भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित होते. रायपूर येथील भाजप प्रदेश कार्यालयात सर्व नवनिर्वाचित आमदारांनी मिळून विष्णुदेव साई यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर विष्णूदेव साई यांनी भाजपचे आभार मानले. एका छोट्या कार्यकर्त्यावर पक्षाने एवढा विश्वास दाखवून राज्याचे नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा यांचेही त्यांनी आभार मानले.
कोण आहेत विष्णुदेव साई ?
छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री बनलेले विष्णूदेव साई चार वेळा खासदार, दोन वेळा आमदार, दोन वेळा केंद्रीय राज्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. याशिवाय संस्थेत काम करण्याचा त्यांना बराच अनुभव आहे. कुणकुरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार यू. डी. मिंज यांनी निवडणूक जिंकल्यानंतर विष्णुदेव साई विधानसभेत पोहोचले. या निवडणुकीत ते २५ हजार ५४१ मतांनी विजयी झाले. छत्तीसगडमधील 90 जागांपैकी भाजपला 54 जागा मिळाल्या, तर काँग्रेसला केवळ 35 जागांवर समाधान मानावे लागले.