मनोरंजन : पाकिस्तानी गायक चाहत फतेह अली खान Chahat Fateh Ali Khan यांनी रील्स आणि युट्युबवर आपले काही गाणी पोस्ट केले होते. हे गाणे सध्या भारतामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वाजत आहेत . अगदी या गाण्यांचे डीजे देखील बनवण्यात आले आहेत. पण जर तुम्ही या गायकाचे नाव ऐकलं तर कदाचित तुम्ही नाक देखील मुरडू शकता.
https://www.instagram.com/p/Cv9TF8fAK1C/?utm_source=ig_web_copy_link
खरंतर पाकिस्तानी गायक चाहत फतेह अली खान यांच्या ‘ बदो बदी ‘ या गाण्याने त्यांनी भारतातून प्रसिद्धी म्हणण्यापेक्षा नकारार्थी प्रसिद्धी जास्त मिळवली. त्यांनी त्यांच्या भेसुर आवाजात हे गाणं पोस्ट केलं खरं पण युजर्सनी त्यांच्या या गाण्यावर पसंती दर्शवली. जुन्या बंगाली गाण्याचं त्यांनी त्यांच्या पद्धतीने वर्जन तयार केले.
पण झालं असं आहे की युट्युब वरून अचानक हे गाणं डिलीट झाल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॉपीराईटच उल्लंघन केल्या प्रकरणी युट्युबवर ही कारवाई केली आहे. बोल नूरजहाच्या 1973 मध्ये आलेल्या बनारसी ठग या चित्रपटातील हे गाणं होतं. त्यामुळे त्यांचं हे गाणं आता युट्युब या प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आलं आहे.
https://www.instagram.com/reel/C68oDlBht5D/?utm_source=ig_web_copy_link
हे गाणं youtube वर डिलीट केल्यानंतर चाहत फतेह अली खान हे गायक अक्षरशः ढसाढसा रडले आहेत. त्यांचा एक फोटो देखील सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो आहे. कारण या गाण्याला आतापर्यंत 28 मिलियन हून अधिक व्ह्यूज मिळाले होते. तर या गाण्यांमधून या गायकांना आतापर्यंत सात मिलियन प्रॉफिट मिळवल आहे.
https://www.instagram.com/reel/C7MIoU5JS8Y/?utm_source=ig_web_copy_link