मुंबई : अंबानींच्या घरचं लग्न म्हंटलं की संपूर्ण देशाचचं नव्हे तर जगाचं लक्ष या सोहळ्याकडे असतं. अनंत अंबानी Ananta Ambani यांच्या लग्न सोहळ्यासाठी प्री-वेडिंग असो किंवा साखरपुड्याचा सोहळा असो अंबानी कुटुंबाने कोणतीही कसर सोडलेली नाही.
नुकताच जामनगरमध्ये अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगचा जंगी सोहळा पार पडला. या सोहळ्याला संपूर्ण बॉलीवूडसह हॉलीवुडच्या गायकांनी देखील हजेरी लावली. त्यानंतर त्यांचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा हा युरोपमध्ये पार पडला आहे. या सगळ्या सोहळ्यांमध्ये या दोघांचं लग्न नेमकं केव्हा होणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आता या दोघांच्या लग्न सोहळ्याची पत्रिका देखील समोर आली आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे हिंदू रितीरिवाजानुसार 12 जुलै रोजी विवाह बंधनात अडकणार आहेत. तर 13 जुलै रोजी आप्तस्वकीयांचे आशीर्वाद घेण्यासाठीचा सोहळा पार पडणार आहे आणि 14 जुलैला रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. असा तीन दिवस हा सोहळा पार पडणार असून मुंबईतील नीता अंबानी यांच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे या तीनही दिवसांसाठी ड्रेस कोड देखील या पत्रिकेमध्ये नमूद करण्यात आले आहेत. यामध्ये पहिल्या दिवशी भारतीय पारंपारिक पोशाख, दुसऱ्या दिवशी इंडियन फॉर्मल आणि वेडिंग रिसेप्शन म्हणजेच तिसऱ्या दिवसासाठी ड्रेस कोड भारतीय असणार आहे.