मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस NCP शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड Jitendra Avhad यांनी महाडमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक घेण्याबाबत निषेध आंदोलन केले. यामध्ये त्यांच्याकडून मनुस्मृतीच्या Manusmruti पुस्तकाच्या सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो देखील फाडला गेला. याबाबत सध्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy CM Devendra Fadnavis यांनी देखील आव्हाडांच्या या कृतीचा निषेध व्यक्त केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या वाराणसी दौऱ्यावर आहेत. देशात शेवटच्या म्हणजेच सातव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी ते उत्तर प्रदेश मध्ये असून यावेळी त्यांना महाराष्ट्रातील अनेक प्रश्नांवर पत्रकारांनी भांबावून सोडले. दरम्यान जितेंद्र आव्हाडांच्या आंदोलनावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ” आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा केलेला अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही.
तसेच कुठल्याही अभ्यासक्रमात कुठेही मनुस्मृतीचा श्लोक घेण्याचा विचार देखील महाराष्ट्र सरकारमध्ये कोणी केलेला नाही. कधीही आलेला नाही. त्या संदर्भात कुठलीही चर्चा नाही” अशी स्पष्ट भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे.