नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्न उपस्थित राहील अशी घटना आज घडली आहे. लोकसभेचे कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या दोघांनी अज्ञातांनी अचानक सभागृहात उडी मारली आणि त्यानंतर ते काही खासदारांपर्यंत पोहोचले. मात्र, लोकसभेत उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना ताब्यात घेतले. यानंतर लोकसभेचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले आहे.
लोकसभेच्या सुरक्षेत मोठी त्रुटी असल्याचा प्रकार समोर आला आहे. लोकसभेचे कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या दोघांनी अचानक सभागृहात उडी मारली. त्यानंतर लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. हे दोघे नेमके कोना आहेत आणि यांनी थेट लोकसभेत जाऊन असा प्रकार का केला हे अद्याप समजू शकले नाही.