महाड : महाडमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांनी आक्रमक भूमिका घेत मनुस्मृतीचे दहन केल आहे. महाडमध्ये चवदार तळ्याजवळ त्यांनी आज मनुस्मृतीचे Manusmruti दहन केल आहे.
नेमकं प्रकरण काय
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एससीईआरटी ने तिसरी ते बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये मनाचे श्लोक आणि भगवत गीतेचा अध्याय घ्यावा असा आराखडा सादर केला. त्यानंतर मनुस्मृतीचे श्लोक शिकवले जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. याबाबत विरोधक संतप्त प्रतिक्रिया देत असतानाच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी थेट मनुस्मृतीचे दहन केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, संभाजी ब्रिगेड यासह समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी देखील मनुस्मृतीला विरोध केला आहे.
यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ” नोटीसिंना घाबरणारे आम्ही नाहीत. केसरकारांची बुद्धी आंबेडकरांपेक्षा जास्त आहे का ? जर मनुस्मृतीतील दोन श्लोक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट होणार असतील तर हळूहळू मनुस्मृतीचा समावेश शालेय अभ्यासक्रमात होणार नाही का ? असा संतप्त सवाल आव्हाड यांनी केला आहे.