मुंबई : मुंबईच्या Mumbai लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्टेशनच्या Lokmanya Tilak Terminus railway station प्लॅटफॉर्म नंबर एक जवळ भीषण आगीची Massive Fire घटना घडली आहे. जन आहार कॅन्टीनमध्ये हि आग लागली असून लेव्हल दोनची ही आग असल्याची माहिती समजते आहे.
सध्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. आग नेमकी कशाने लागली हे अद्याप समजू शकले नाही. तथापि सुरक्षेच्या दृष्टीने प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर येणाऱ्या रेल्वे गाड्यांची वाहतूक थांबवण्यात आली आहे.