मुंबई : माजी महापौर दत्ता दळवी Former Mayor Datta Dalvi यांना दोन दिवसांपूर्वी अटक Arrest करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांच्या बाबत अपशब्द वापरल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेबाबत भांडुप पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी कारवाई करून त्यांना अटक केली होती. दरम्यान कोर्टाने दत्ता दळवी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील सुनावली होती. दरम्यान दत्ता दळवी यांना आता मुलुंड कोर्टाने जामीन मंजूर Datta Dalvi Granted Bail केला आहे.
15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आला असून आरोपी हे वरिष्ठ नागरिक आहेत. त्याचबरोबर त्यांच्या तब्येतीचे कारण देखील असून ते पळून जाण्याची भीती नाही म्हणून जामीन मंजूर करण्यात येत असल्याचं न्यायालयाने म्हटले आहे.
दत्ता दळवी यांनी थेट मुख्यमंत्र्यांबाबत शिवीगाळ केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान 15000 रुपयांच्या जात मुचलक्यासह त्यांचे वय पाहता हा जामीन मंजूर करण्यात आला असून त्यासह पाच अटी देखील न्यायालयाने घातल्या आहेत त्यानुसार ,
- प्रकरणाचा तपास संप पर्यंत काही प्रतिबंध लागू असणार आहेत.
- कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ नये याची काळजी घेणं बंधनकारक असणार
- पुन्हा मुख्यमंत्र्यांविरोधात कोणतही अवमानकारक वक्तव्य करण्यास मनाई
- कोणत्याही प्रकारचे प्रक्षोभक वक्तव्य करण्यास मनाई
- तसेच पोलिसांना सहकार्य करणे देखील बंधनकारक असल्याची अट न्यायालयाने घातली आहे.
ठाणे पोलिसांची जमाव बंदीची घोषणा
दरम्यान दत्ता दळवी यांना जामीन मंजूर व्हावा यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांच्या सुटके नंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून ठाणे पोलिसांनी जमावबंदीची घोषणा केली आहे. मुलुंड कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला असून ठाणे मध्यवर्ती कारागृहातून दत्ता दळवी यांची सुटका होणार आहे. दरम्यान ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा पाऊस फाटा तैनात करण्यात आला आहे.