आयोध्या : आज देशामध्ये दिवाळी साजरी होते आहे. खऱ्या अर्थाने दिवाळी ज्या कारणासाठी साजरी केली जाते तोच आजचा दिवस…! म्हणजेच प्रभू श्रीरामचंद्र वनवास संपवून जेव्हा अयोध्येस परतले होते. यासाठी आयोध्यावासियांनी त्यावेळी दीप प्रज्वलित करून गोडधोड करून आनंदउत्सव साजरा केला होता . आज अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा तोच सोहळा भारतीयांनी अनुभवला आहे. आज पुन्हा एकदा प्रभू श्री रामचंद्र वनवास संपवून परतले आहेत. आज संपूर्ण देशवासी यांची अशीच भावना आहे. तुम्हाला देखील प्रभू श्रीरामचंद्रांच्या या मोहक रूपाचं दर्शन घ्यायचं असेल आणि आयोध्यामध्ये येण्याचा विचार करत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे.
22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि अभिषेक झाल्यानंतर 23 जानेवारीपासून मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहेत. यानंतर भाविकांना मंदिरात प्रवेश करून रामलल्लाचे दर्शन घेऊन त्यांच्या आरतीला उपस्थित राहता येणार आहे.

आरतीची वेळ काय आहे ?
अयोध्या राम मंदिर, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या अधिकृत वेबसाइटनुसार, भाविक सकाळी 7 ते 11:30 या वेळेत मंदिरात दर्शनासाठी येऊ शकतात. त्यानंतर दुपारी २ ते ७ या वेळेत सायंकाळच्या दर्शनासाठी येऊ शकता.
`रामलल्लाच्या दर्शनासोबतच त्यांच्या सकाळ-संध्याकाळच्या आरतीलाही तुम्ही उपस्थित राहू शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला पास बुक करावे लागतील. आरतीसाठी मिळणारे पास मोफत आहेत, पण त्यासाठी तुम्हाला पहिला बुकिंग पास घ्यावा लागेल. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन प्रकारे पास बुक करता येतो.`रामलल्लाच्या दर्शनासोबतच त्यांच्या सकाळ-संध्याकाळच्या आरतीलाही तुम्ही उपस्थित राहू शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला पास` बुक करावे लागतील. आरतीसाठी मिळणारे पास मोफत आहेत, पण त्यासाठी तुम्हाला पहिला बुकिंग पास घ्यावा लागेल. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन प्रकारे पास बुक करता येतो.

राम मंदिराच्या वेबसाईटवर ऑनलाइन पास बुकिंग करण्यात येणार असून श्रीराम जन्मभूमीच्या कॅम्प ऑफिसमध्ये जाऊन ऑफलाइन बुकिंग करता येणार आहे. यासाठी तुम्हाला वैध सरकारी ओळखपत्र दाखवावे लागेल, त्यानंतरच तुम्हाला पास मिळेल.
सकाळच्या श्रृंगार आरतीसाठी एक रात्र अगोदर बुक करावी लागते आणि संध्याकाळच्या आरतीसाठी अर्धा तास अगोदर जावे लागते. पासशिवाय तुम्हाला मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला रामलल्लाचे दर्शन घ्यायचे असेल तर पास बुक करा आणि तुमचा सरकारी आयडी सोबत घेऊन जा.