पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi हे सध्या तमिळनाडूमध्ये स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ध्यान साधनेसाठी बसलेले आहेत. या ध्यान साधनेचे लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे. यावर काँग्रेसने विरोध दर्शविला असून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांनी खोचक शब्दात टीका केली आहे.
काय म्हणाले वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्यान साधनेबाबत टीका करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ” मोदी हे उत्कृष्ट अभिनेते आहेत. मला आश्चर्य वाटते की यांना यावर्षी कांस फिल्म फेस्टिवलमध्ये Cannes Film Festival नामांकन का मिळाले नाही? काही दिवसांपूर्वी मोदींनी स्वतःची देवासोबत तुलना केली होती. जर ते खरंच देव असतील तर ते स्वतःला कोणाशी जोडण्यासाठी ध्यान का करत आहेत ?” असा खोचक सवाल प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तमिळनाडूतील कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये सध्या ध्यान साधनेला बसले आहेत. तब्बल 45 तास त्यांची ही ध्यान साधना सुरू असून 35 तासांचे मौन व्रत देखील ते धारण करणार आहेत. या काळामध्ये पंतप्रधान केवळ नारळ पाणी आणि द्राक्षांचा ज्यूस घेणार असून गुरुवारी सायंकाळी सहा वाजून 45 मिनिटांनी ही साधना सुरू झाली आहे. तर एक जूनला संध्याकाळी मोदींची ही साधना सांगता होईल.