• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, July 22, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अजित पवार अर्थमंत्री नको! बच्चू कडूंनी मांडली शिंदे गटाची भूमिका

Manasi Devkar by Manasi Devkar
July 12, 2023
in महाराष्ट्र, POLITICS
0
अजित पवार अर्थमंत्री नको! बच्चू कडूंनी मांडली शिंदे गटाची भूमिका
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्यात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तीन पक्षांच्या आघाडीचं सरकार आहे. सुरुवातीला शिंदे-भाजप यांचं ‘डबल इंजिन’चं सरकार अशी ओळख निर्माण करणाऱ्या या सरकारमध्ये आता राष्ट्रवादी अजित पवार गट सामील झाला आहे. काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी शपथ सुद्धा घेतली. यामुळे शिंदे गट नाराज झाला आहे, अशी दबक्या आवाजात रंगणारी चर्चा आता खरी ठरत असल्याचं दिसतंय.

शिंदे गट समर्थक अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अजित पवारांविषयीची (Bacchu Kadu on Ajit Pawar) आपली नाराजी जाहीररीत्या व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने आधीच बच्चू कडू नाराज आहेत. वेळोवेळी त्यांनी नाराजी बोलून दाखवली आहे. कधी सरकारवर ताशेरे देखील ओढले. मात्र आता राष्ट्रवादी देखील सत्तेत सहभागी झाल्याने अजित पवारांना अर्थमंत्री केलं जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे, ज्यामुळे अजितदादांना अर्थमंत्री पद देऊ नका अशी मागणीच कडू यांनी केली आहे.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024

राष्ट्रवादीच्या एन्ट्रीने वाट्याला येणाऱ्या मंत्रिपदांची संख्या कमी होणार, हे आता निश्चित आहे. त्यातही महाविकास आघाडीच्या काळात अजितदादा आपल्या मतदारसंघात निधी देत नाहीत, दुजाभाव करतात, असा आरोप करणाऱ्या शिंदे गटाची आता कोंडी झाली आहे. मात्र, आता पुन्हा राष्ट्रवादीकडेच अर्थ खातं गेलं तर शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले बच्चू कडू?

अजित पवार युतीत आल्याने आता कुणाच्या वाट्याला किती पदं येणार? कोणत्या पक्षाला कोणती खाती मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण रस्सीखेच मात्र नक्कीच सुरू झाली आहे. याच मुद्द्यावर आज नागपुरात बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. कडू म्हणाले, “महाविकास आघाडीच्या काळात अजित पवारांमुळे आम्ही बंड केलं असं सांगत होतो. पण तेच अजितदादा आता सरकारमध्ये आल्याने आमच्यासाठी मोठा पेच निर्माण झाला आहे.”

“मागच्या 20 वर्षांत मी जे शिकलो नाही, ते या 5 वर्षांत शिकलो. राजकारणात अशा गोष्टी घडत असतात. राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा म्हंटलं होतं. पण आता त्यांना त्यांच्यासोबत युती करावी लागली. त्यांना वरून आदेश असतील. त्यामुळे त्यांनी केलं असेल”, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं.

तर अजित पवारांना अर्थमंत्री करू नये, अशी इच्छा देखील कडू यांनी व्यक्त केली. अजित पवार जर पुन्हा एकदा अर्थमंत्री झाले तर राष्ट्रवादीच्या आमदारांना जास्त निधी आणि इतर आमदारांना कमी निधी, असा पूर्वीचाच प्रकार परत घडेल. त्यामुळे त्यांच्याकडे अर्थ खातं देवू नये, अशी सर्वांची अपेक्षा आहे, असंही कडू यांनी सांगितलं. तसंच येणाऱ्या काळात निधी वाटपात ढवळाढवळ झाल्यास खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

हे देखील वाचा

मंत्रालयातील खोली क्र. 602 विषयी राजकारण्यांच्या मनी भीती का?

Mantralaya Cabin no. 602: मंत्रालयातील खोली क्र. ६०२ विषयी राजकारण्यांच्या मनी भीती का?
Previous Post

Panshet Dam Burst : पानशेत धरण फुटीला ६२ वर्षे पूर्ण, धरण फुटल्यानंतर नेमकं काय घडलं होतं? वाचा सविस्तर

Next Post

Tata Group : टाटा समूह बनणार पहिला भारतीय आयफोन निर्माता, आयफोनची नवीन सीरिज होणार लॉंच

Next Post
Tata group and Iphone

Tata Group : टाटा समूह बनणार पहिला भारतीय आयफोन निर्माता, आयफोनची नवीन सीरिज होणार लॉंच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Governor Ramesh Bais : ‘वृद्ध मित्र’ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मार्गदर्शक उपक्रम व्हावा

Governor Ramesh Bais : ‘वृद्ध मित्र’ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मार्गदर्शक उपक्रम व्हावा

3 years ago
kargil vijay divas

कारगिल विजय दिवस, कहाणी भारतीय सैनिकांच्या शौर्यगाथेची

3 years ago
Old pension schemes : जुन्या पेन्शन योजनेबाबत विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेणार; वित्तमंत्री अजित पवार यांचे विधानपरिषदेत आश्वासन

Old pension schemes : जुन्या पेन्शन योजनेबाबत विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेणार; वित्तमंत्री अजित पवार यांचे विधानपरिषदेत आश्वासन

3 years ago
Bageshwar baba- Shivranjani

Shivranjani Tiwari : बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्याशी लग्नाची चर्चा खोटी? शिवरंजनी म्हणाली- ‘माझा लग्नाचा संकल्प…’

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.