हिंगोली : हिंगोलीमधून एक मोठी बातमी समोर येते आहे. आज मतमोजणीला जोरदार सुरुवात झाली आहे. पण मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच हिंगोलीतील EVM मध्ये बिघाड झाला असल्याची माहिती निवडणूक सहाय्यक अधिकारी यांनी दिली आहे.
खिडकी बूथ क्रमांक आठ खोली क्रमांक एक मधील ही ईव्हीएम मशीन असल्याचे समजते आहे. हा बिघाड झाल्यानंतर हिंगोली निवडणूक सहाय्यक अधिकारी यांनी ही मशीन ताब्यात घेतली असून आता या ईव्हीएम मशीन मध्ये मतदान किती झाले हे दाखवत आहे. पण नेमकं कोणत्या उमेदवाराला किती मतदान झालं हे दिसून येत नसल्याकारणाने आता बॅलेट पेपरचे मतदान मोजलं जाणार असल्याची माहिती मिळते आहे.
हिंगोली मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे बाबुराव कदम कोहळीकर यांच्याविरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून नागेश पाटील यांच्यामध्ये लढत झाली आहे. तर 62.54% मतदान पार पडले आहे.