पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ हे तब्बल 86 हजार 369 मतांनी विजयी झाले. महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रवींद्र धंगेकर यांचा पराभव करून खासदारकी जिंकलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यात आता थेट मंत्रीपदाची माळ पडली आहे.
पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यात आता केंद्रीय राज्यमंत्री म्हणून माळ पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रविवारी 9 जून रोजी सायंकाळी सात वाजता शपथ ग्रहण विधी पार पडला. यावेळीच केंद्रीय राज्यमंत्री म्हणून मुरलीधर मोहोळ यांनी देखील शपथ घेतली आहे.
https://www.facebook.com/share/v/c92yGujQY41ApgqT/?mibextid=qi2Omg
मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पुण्यामध्ये देखील कोथरूड भागामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला आहे. काय म्हणतात पुणेकर मंत्री झाले मुरलीधर असा फलक यावेळी कार्यकर्त्यांनी लावला आहे. महाराष्ट्रातून नितीन गडकरी, मुरलीधर मोहोळ, पीयूष गोयल, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव, रामदास आठवले यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.
नरेंद्र मोदी – पंतप्रधान
कॅबिनेट मंत्री
१. राजनाथ सिंह – भाजप
२. अमित शाह – भाजप
३. नितीन गडकरी – भाजप
४. जगतप्रकाश नड्डा – भाजप
५. शिवराजसिंह चौहान – भाजप
६. निर्मला सीतारामन – भाजप
७. डॉ. सुब्रमण्यम जयशंकर – भाजप
८. मनोहर लाल – भाजप
९. एच. डी. देवेगौडा – जेडीएस
१०. पियूष गोयल – भाजप
११. धर्मेंद्र प्रधान – भाजप
१२. जितनराम मांझी – हम
१३. राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह – जदयु
१४. सर्वानंद सोनोवाल – भाजप
१५. डॉ. वीरेंद्र कुमार – भाजप
१६. किंजरापुर राममोहन नायडू – तेलुगू देशम
१७. प्रल्हाद जोशी – भाजप
१८. जुएल ओराम – भाजप
१९. गिरीराज सिंह – भाजप
२०. अश्विनी वैष्णव – भाजप
२१. ज्योतिरादित्य सिंदिया – भाजप
२२. भूपेंद्र यादव – भाजप
२३. गजेंद्रसिंह शेखावत – भाजप
२४. अन्नपूर्णा देवी – भाजप
२५. किरेन रिजिजू – भाजप
२६. हरदीप सिंग पुरी – भाजप
२७. डॉ. मनसुख मांडविया – भाजप
२८. जी. किशन रेड्डी – भाजप
२९. चिराग पासवान – लोजपा (रामविलास)
३०. सी. आर. पाटील – भाजप
राज्यमंत्री – स्वतंत्र प्रभार
१. राव इंद्रजित सिंह – भाजप
२. डॉ. जितेंद्र सिंह – भाजप
३. अर्जुन राम मेघवाल – भाजप
४. प्रतापराव जाधव – शिवसेना
५. जयंत चौधरी – राष्ट्रीय लोकदल
राज्यमंत्री
१. जितिन प्रसाद – भाजप
२. श्रीपाद नाईक – भाजप
३. पंकज चौधरी – भाजप
४. रामदास आठवले – रिपाई (आठवले)
५. रामनाथ ठाकुर – जदयु
६. नित्यानंद राय – भाजप
७. अनुप्रिया पटेल – अपना दल
८. व्ही सोमन्ना – भाजप
९. डॉ. चंद्रशेखर पेम्मासनी – तेलुगू देशम
१०. प्रा. एसपी सिंह बघेल – भाजप
११. शोभा करंदलाजे – भाजप
१२. कीर्तीवर्धन सिंह – भाजप
१३. बी. एल. वर्मा – भाजप
१४. शांतनू ठाकुर – भाजप
१५. सुरेश गोपी – भाजप
१६. डॉ. एल. मुरुगन – भाजप
१७. अजय तम्टा – भाजप
१८. बंडी संजय कुमार – भाजप
१९. कमलेश पासवान – भाजप
२०. भगीरथ चौधरी – भाजप
२१. सतीशचंद्र दुबे – भाजप
२२. व्ही. संजय सेठ – भाजप
२३. रवनीत सिंग – भाजप
२४. दुर्गादास उईके – भाजप
२५. रक्षा खडसे – भाजप
२६. सुकांता मुजुमदार – भाजप
२७. सावित्री ठाकुर – भाजप
२८. तोखन साहू – भाजप
२९. राजभूषण चौधरी – व्हीआयपी
३०. भूपती राजू श्रीनिवास वर्मा – भाजप
३१. हर्ष मल्होत्रा – भाजप
३२. निमुबेन भांबनिया – भाजप
३३. मुरलीधर मोहोळ – भाजप
३४. जॉर्ज कुरियन – भाजप
३५. पवित्र मार्गारिटा – भाजप