• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, July 7, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home तंत्रज्ञान

BSNL येत्या काळात Jio-Airtel ला टक्कर देणार?

Web Team by Web Team
June 9, 2023
in तंत्रज्ञान, देश-विदेश
0
BSNL revival package story

BSNL revival package story

10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : देशात सध्या दूरसंचार क्षेत्रात Jio आणि Airtel या दोनच कंपन्या टिकून असल्याचं पाहायला मिळतं. व्होडाफोन-आयडिया यांच्या VI कंपनीला देखील गेल्या काही वर्षांमध्ये ग्राहकांना तितक्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आकर्षित करता आलं नाही. या तीन खासगी कंपन्यानंतर नंबर लागतो तो भारताची सरकारी दूरसंचार ऑपरेटर कंपनी असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) चा.

खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत बीएसएनएल गेल्या काही वर्षात बरीच मागे पडल्याचं दिसत आहे. जिओ-एअरटेल सारख्या कंपन्या 5G सेवा देऊन ग्राहकांना आकर्षित करत असतानाच्या काळात बीएसएनएल मात्र अजूनही 4G सेवेसाठी धडपडताना दिसत आहे. मात्र केंद्र सरकारने आता ही सेवा सुधारण्यासाठी मोठं पाऊल उचलल्याचं दिसत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 7 जून रोजी सरकारी BSNL साठी 89 हजार कोटी रुपयांचे पॅकेज देण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी दूरसंचार कंपन्यांच्या स्पर्धेत बीएसएनएलला पुन्हा उभं करण्याच्या दृष्टीने हे महत्वाचं पाऊल मानलं जात आहे.

Related posts

अरे बापरे, Google Pay बंद ? कंपनीने का घेतला एवढा मोठा निर्णय

अरे बापरे, Google Pay बंद ? कंपनीने का घेतला एवढा मोठा निर्णय

June 10, 2024
Rafale Fighter Jets : भारतीय नौदलात सामील होणार 26 राफेल फायटर जेट्स; या राफेलची खासियत वाचून अचंबित व्हाल

Rafale Fighter Jets : भारतीय नौदलात सामील होणार 26 राफेल फायटर जेट्स; या राफेलची खासियत वाचून अचंबित व्हाल

May 29, 2024

BSNL साठी विशेष तरतूद

सरकारकडून मिळणाऱ्या या पॅकेजमुळे बीएसएनएलला 4G आणि 5G स्पेक्ट्रम खरेदी करण्यास मदत होणार आहे. बीएसएनएलला त्यांच्या सेवेसाठी 700 मेगाहर्टझ बँड लहरींचे वाटप करण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे. या बँडमुळे जास्त लोकसंख्येच्या क्षेत्रात देखील चांगली कवरेज पुरवता येते. सध्या भारतात केवळ जिओ कडे 700 मेगाहर्टझ बँडचा वापर करण्याची परवानगी आहे. आता जिओनंतर या बँडचा वापर करणारी बीएसएनएल ही दुसरी कंपनी असणार आहे.

खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत BSNL टिकणार का?

एक काळ होता की बीएसएनएलचं कनेक्शन मिळणं ही देखील मोठी कठीण गोष्ट होती. भारताच्या अनेक गावांमध्ये आजही बीएसएनएलचेच नेटवर्क मिळते. आजच्या घडीला मात्र जिओ, एअरटेल, व्ही अशा अनेक प्रायवेट कंपन्यांच्या स्पर्धेत बीएसएनएल कुठेच असल्याचं दिसत नाही. बदलतं तंत्रज्ञान आणि वाढती स्पर्धा या काळात बीएसएनएल टिकाव धरु शकलं नाही. या कंपन्यांनी मागच्या काही वर्षात 4G सेवा देत ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित केले. जिओ-एअरटेल सारख्या कंपन्या भारताच्या अनेक मोठ्या शहरात सध्या 5G सेवा देखील देत आहे. बीएसएनएल मात्र अजूनही 4G सेवा देण्याची तयारीच करत आहे.

2019 मध्ये सरकारने बीएसएनएलला 69 हजार कोटींचे पॅकेज दिले होते. त्यानंतर 2022 मध्ये 1 लाख 64 हजार कोटींचे पॅकेज दिले होते. दुसऱ्या वेळेस पॅकेज दिल्यानंतर बीएसएनएलने गेल्या आर्थिक वर्षात 1500 कोटी रुपयांचा ऑपरेशनल नफा कमावल्याचं देखील सरकारकडून सांगण्यात येत आहे.

यापू्र्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड (BBNL) चे BSNL मध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. या विलीनीकरणासह, BSNL ला अतिरिक्त 5.67 लाख किमी ऑप्टिकल फायबर नेटवर्क मिळाले, ज्याची व्याप्ती सुमारे 1.85 लाख ग्रामपंचायतींमध्ये पसरली होती.

BSNL पुन्हा उभं राहण का गरजेचं?

दुरसंचार मार्केटमध्ये सध्या दोन मोठ्या कंपन्यांची चलती असल्याचं पाहायला मिळतं. बीएसएनएल पुन्हा जोमात उभी राहिल्यास ग्राहकांना एक मोठा पर्याय उपलब्ध राहील. त्यामुळे खासगी कंपन्यांच्या मनमानी रेट आणि वाईट सर्विसला चाप बसेल. बीएसएनएलचे पुनरुज्जीवन झाल्यास खासगी कंपन्यांना देखील त्यांच्या सेवेत सुधार करावा लागेल तसेच दरांवर नियंत्रण आणावं लागेल.

Previous Post

BRS Maharashtra : महाराष्ट्रात येत्या विधानसभा निवडणुकीत बीआरएस महत्वाचा पक्ष ठरणार?

Next Post

Biparjoy Latest Update : येत्या 24 तासात Biparjoy चक्रीवादळ घालणार धुमाकूळ ! आयएमडीने दिला इशारा

Next Post
Biparjoy Cyclone

Biparjoy Latest Update : येत्या 24 तासात Biparjoy चक्रीवादळ घालणार धुमाकूळ ! आयएमडीने दिला इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Emergency Landing : अक्सा एयरलाईनमध्ये अजब प्रकार; प्रकृती अस्वाथ्यामुळे केले लँडिंग, मग प्रवासी म्हणे माझ्या बागेत बॉंम्ब आहे ! विमानतळावर गोंधळ

Emergency Landing : अक्सा एयरलाईनमध्ये अजब प्रकार; प्रकृती अस्वाथ्यामुळे केले लँडिंग, मग प्रवासी म्हणे माझ्या बागेत बॉंम्ब आहे ! विमानतळावर गोंधळ

3 years ago
Cabinet Meeting : मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर जलसिंचन होणार; मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

Cabinet Meeting : मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर जलसिंचन होणार; मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

3 years ago
PUNE METRO : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमुळे चार लाख प्रवाशांना लाभ होईल – मंत्री चंद्रकांत पाटील

PUNE METRO : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमुळे चार लाख प्रवाशांना लाभ होईल – मंत्री चंद्रकांत पाटील

3 years ago
Transport Union Strike : स्कूलबस चालकांनी संपात सहभाग घेतला तर… शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी खडसावून सांगितले

Transport Union Strike : स्कूलबस चालकांनी संपात सहभाग घेतला तर… शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी खडसावून सांगितले

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.