जालना : जालन्यातून Jalana एक धक्कादायक प्रकरण समोर येते आहे. जालन्यातील जिल्हा परिषदेच्या Jilha Parishad कार्यालयासमोरच तीन युवकांनी अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रमाई आवास योजनेमध्ये घरकुल न मिळाल्याने या युवकांनी असे टोकाचे पाऊल उचलले आहे.
काय म्हणतात पुणेकर मंत्री झाले मुरलीधर ! खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यात थेट मंत्रीपदाची माळ
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव या गावांमध्ये 32 जणांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला. पण या तीन युवकांना मात्र कोणताही लाभ मिळाला नसून या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप या युवकांनी केला आहे. त्यामुळेच न्याय मागण्यासाठी या युवकांनी टोकाचे पाऊल उचलून आज जालन्यातील जिल्हा परिषद कार्यालयासमोर थेट डोक्यावर डिझेलच्या बाटल्या ओतून घेतल्या. सुदैवानं जवळ असलेल्या नागरिकांनी या तरुणांना थांबवलं, त्यामुळे जीवित हानी टळली आहे. परंतु या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.