नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडणाऱ्या पुणेकऱ्यांच्या सोयीसाठी वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. (Pune New Year celebration traffic restrictions) वाहतुक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता तसेच महात्मा गांधी रस्ता येथील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पुणेकर शहरातील मध्यवर्ती भागात दरवर्षी गर्दी करतात. ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळपासून डेक्कन आणि कॅम्प परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ पाहायला मिळते. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेनंतर या भागातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. मध्यरात्री नागरिकांची वर्दळ कमी होईपर्यंत हे बदल लागू असतील.
या मार्गांवरील वाहतुकीत बदल :
जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूक झाशीची राणी चौकातून बंद करण्यात येईल. (Pune JM Road Traffic restricions) या भागातील वाहतूक गोखले स्मारक चौक, पुणे महापालिका, ओंकारेश्वर मंदीर यामार्गे वळवण्यात येईल.
फर्ग्युसन कॉलेज रस्ता आणि महात्मा गांधी रस्ता हे या काळात नो व्हेईकल झोन असतील. तसेच या रस्त्यावर ३१ डिसेंबर संध्याकाळी ५ वाजेपासून १ जानेवारीला पहाटे ५ वाजेपर्यंत पार्किंगला बंदी असेल.
कोथरुडकडून फर्ग्यूसन कॉलेज रस्त्याकडे येणारी वाहतूक खंडुजीबाब चौक येथे थांबविण्यात येईल.(Pune FC road Traffic restricions) लॉ कॉलेज रस्ता, प्रभात रस्ता या पर्यायी मार्गांचा वापर करता येईल.
महात्मा गांधी रस्त्यावरील १५ ऑगस्ट चौक पासून अरोरा टॉवर्स चौकपर्यंत वाहतूक बंद असेल. या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे. तसेच इस्कॉन मंदिराकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता आणि अरोरा टॉवर्सकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.