मुंबई : राजकीय वर्तुळातून Maharashtra Politics आज एक मोठी बातमी समोर येते आहे. शिवसेना Shivsena शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट Sanjay Shirsath यांनी ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर Gajanan Kirtikar यांच्या निलंबनाबाबत मोठी माहिती दिली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये सातत्याने भडका उडतो आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते विरुद्ध भाजप असे वाद सुरू झाल्यामुळे आता शिंदे गट गजानन कीर्तिकर यांच्यावर थेट पक्षातून हकलपट्टीची कारवाई करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगते आहे. दरम्यान एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच शिंदे गटाकडून गजानन कीर्तिकर यांच्यावर नेमकी काय कारवाई करायची हे निश्चित होईल असं सांगितलं आहे.
पुत्र प्रेमापोटी अडचणीत येणार गजानन कीर्तिकर
नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. दरम्यान या लोकसभा निवडणुकीमध्ये वायव्य मुंबई लोकसभा मतदार संघातून शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांच्याविरुद्ध अमोल किर्तीकर अशी लढत झाली आहे. अमोल कीर्तीकर हे गजानन कीर्तिकर यांचे सुपुत्र आहेत. यावेळी ” निवडणुकीत रवींद्र वायकर हरले काय किंवा जिंकले काय यामध्ये माझा काय दोष, मी त्यांचा प्रचार करण्याचं काम केलं आहे. वायकरांना विजयी करायचे की पराभूत हे मतदारांच्या हातात आहे.” असं वक्तव्य गजानन कीर्तीकर यांनी केलं होतं. यावेळी कीर्तीकरांच्या या वक्तव्यावरून शिरीष शिंदे यांनी त्यांची हकालपट्टी पक्षातून केली जावी अशी मागणी केली होती. तसेच आपल्या मुलाला निवडणुकीत निवडून आणायचे म्हणून गजानन कीर्तिकर यांनी कट रचला असा थेट आरोप देखील प्रवीण दरेकर यांनी केलाय. यावर ” कटकारस्थान करणे मला जमत नाही ती सवय भाजपची आहे…!” अशी घणाघाती टीका गजानन कीर्तीकर यांनी केली होती.
https://www.facebook.com/share/v/9ji9zYyL6K5QLEyR/?mibextid=qi2Omg
एकंदरीतच गजानन कीर्तिकर यांनी पुत्र प्रेमापोटी स्व-पक्षालाच घरचा आहेर द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच आता गजानन कीर्तीकर यांच्यावर नेमकी काय कारवाई होते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.