Baldness : केस सतत गळायले लागले तर टक्कल पडायला वेळ लागत नाही, यासाठी तुम्हाला हेल्दी फूड खावे लागेल आणि त्याचबरोबर काही घातक पदार्थांपासून दूर राहावे लागेल.
केस गळताना टाळावे लागणारे पदार्थ : सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकांना केसगळतीचा त्रास होतो. हे बऱ्याचदा अनुवांशिक कारणांमुळे असू शकते, परंतु तणाव, प्रदूषण, दूषित पाणी आणि अनहेल्दी आहार हे देखील कारणीभूत थरू शकतात. केसांना अन्नातून आंतरिक पोषण मिळते, त्यामुळे केस मजबूत होतात. केस सतत गळत असतील तर वेळीच काळजी घेण्याची गरज आहे, अन्यथा लहान वयातच टक्कल पडण्याची शक्यता आहे. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्हाला फक्त हेल्दी फूड खावेच लागेल असे नाही तर काही अनहेल्दी गोष्टींपासूनही दूर राहावे लागेल. चला जाणून घेऊया आहारातून कोणत्या गोष्टी पूर्णपणे काढून टाकल्या पाहिजेत.
१. साखरेपासून तयार केलेले पदार्थ
साखर सामान्यतः मधुमेहाचा शत्रू मानली जाते, कारण ती रक्तातील साखरेची पातळी वाढवते, परंतु ती आपल्या केसांची तितकीच मोठी शत्रू आहे. केसांच्या निर्मितीसाठी प्रथिने आवश्यक असतात, परंतु साखर शोषण्यात अडचणी निर्माण करते. म्हणूनच साखरेने तयार केलेल्या गोष्टी शक्यतो टाळा.
२. डाएट सोडा
हल्ली डाएट सोडा पिण्याचा ट्रेंड तरुणांमध्ये खूप दिसतो, त्यामुळे आजकाल तरुण वयोगटातील लोक केस गळणे, टक्कल पडणे याला बळी पडत आहेत. डाएट सोडामध्ये कृत्रिम स्वीटनर असते ज्यामुळे शरीराला हानी पोहोचते. त्यामुळे टक्कल पडू नये म्हणून डाएट सोड्याचे सेवन बंद करा.
३. अल्कोहोल
अल्कोहोल आपल्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहे हे सांगण्याची गरज नाही, यामुळे यकृतासह अनेक अवयवांचे नुकसान होते, परंतु अल्कोहोल केसांसाठी देखील हानिकारक आहे हे फार कमी लोकांना माहितीये. आपले केस केरॅटिन नावाच्या प्रथिनापासून बनलेले असतात. जर तुम्ही अल्कोहोल प्यायले तर त्याचा प्रोटीन संश्लेषणावर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे केसांची चमक तर कमी होतेच पण केसही गळतात.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. महाटॉक्स याची पुष्टी करत नाही.)