INFORMATIVE : घरात आपण किती मूल्यांचे सोन्याचे दागिने Gold Jewelry ठेऊ शकतो, ही बाब सर्वांनाच ठाऊक असते असे नाही. माहिती अभावी अनेकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. म्हणून घरात कितपत दागदागिने ठेऊ शकतो, हे ठाऊक असणे आवश्यक आहे. सरकारने सोने नियंत्रण कायदा अगोदरच मागे घेतलेला आहे. तत्कालिन काळात हा कायदा लागू असताना घरात किती दागिने ठेवायचे याबाबतचे नियम सर्वांना ठाऊक असायचे. हा कायदा आता कालबाह्य होऊनही अनेकांना सोन्याचे दागिने बाळगण्याबाबतची माहिती नसल्याचे दिसून येते. प्राप्तीकर विभाग म्हणजे ‘सीबीडीटी’ने मे १९९४ मध्ये जारी केलेल्या एका आदेशानुसार घरात सोने ठेवण्याची मर्यादा आखून दिली आहे.
महिलांसाठी किती मर्यादा असते ?
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) ने मे १९९४ रोजी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले, की कोणत्याही कुटुंबातील एका विवाहित महिला सदस्याला स्वत:कडे कमाल ५०० ग्रॅम म्हणजे अर्धा किलो सोने बाळगता येऊ शकते. एखाद्या कुटुंबात महिला अविवाहित असेल तर तिला २५० ग्रॅम सोन्याचे दागिने ठेवता येऊ शकते. केवळ महिलांसाठीच नाही तर पुरुषांसाठी देखील सोन्याबाबत नियम निश्चित केले आहेत. एखादा विवाहित किंवा अविवाहित पुरुष हा कमाल १०० ग्रॅम सोने ठेऊ शकतो. पण प्राप्तीकर खात्याच्या तपासणीत प्रमाणापेक्षा कमी सोने असेल आणि त्याचे पुरावे असेल तर त्याची जप्ती केली जात नाही.
मर्यादेपेक्षा अधिक सोने असल्यास
सीबीडीटीच्या अधिसूचनेनुसार मर्यादेपेक्षा अधिक कोणीही सोने बाळगू शकत नाहीत. मात्र संबंधितांकडे त्याचे पुरावे असतील, कागदपत्रे, खरेदीच्या पावत्या असतील त्याची माहिती सादर करावी लागेल. याउपरही प्राप्तीकर खात्याचे समाधान झाले नाही आणि स्रोताचा शोध लागला नाही तर सोने जप्त होऊ शकते. अर्थात कमाल मर्यादेपर्यंतचे सोने प्राप्तीकर खाते जप्त करत नाही. अतिरिक्त सोने सरकारी दरबारी जमा करू शकते. नियमानुसार घरात ठेवलेल्या सोन्याच्या पावत्या दाखवणेही बंधनकारक आहे.
खरेदीच्या रक्कमेचा स्रोत
सरकारच्या नियमानुसार घरात असलेले सोन्याचे दागिने जप्त करता येत नाही, असा जर आपण विचार करत असाल तर थांबा. हे चुकीचे मत आहे. कारण आपल्याकडील प्रत्येक सोन्याची, दागिन्यांची इंत्यभूत माहिती देणे आवश्यक आहे. खरेदीची पावती आणि त्याचा स्रोत सादर करावा लागतो. सोन्याची खरेदी रोख रुपात झालेली नसावी. अन्यथा सोने जप्त केले जावू शकते. प्राप्तीकर विभागाच्या अधिकार्यांचे समाधान होत असेल तर नियमानुसार असलेल्या दागिन्यांना ते हात लावणार नाहीत.
सोने खरेदीचे माध्यम
सोन्याची खरेदी ही नेहमीच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, चेकबुक, बँक ड्राफ्टने करायला हवी. एका अर्थाने आपण सोने खरेदी वैध मार्गाने केल्याचे सिद्ध होते. रोखीने सोने खरेदीची मुभा आहे, मात्र कमाल दोन लाखांपर्यंतच सोन्याची खरेदी करता येऊ शकते. यासाठी देखील पॅनकार्डची मागणी केली जावू शकते. सोने खरेदी करणारा वय्क्ती जर दोन लाखांच्या मूल्यांपेक्षा अधिक दागिने खरेदी करत असेल तर त्याला जादा रक्कमेच्या प्रमाणात दंड भरावा लागेल.
सोने दागिन्याच्या रुपातच ठेवा
प्राप्तीकर विभागाच्या नियमानुसार सोन्याचे दागिने ठेवण्याची कमाल मर्यादा निश्चित केलेली आहे. त्यानुसार घरात सोने मर्यादेत रुपात असले तरी ते दागिन्याच्यांच रुपात असावे, याबाबत काळजी घ्यावी, सोन्याचे बिस्कीट, विट किंवा भांड्याच्या रुपातून नसावे. दागिन्यांव्यतिरिक्त अन्य रुपातून सोने सापडत असेल तर ते जप्त केले जाते.