पुणे : राजकारणाची काळी बाजू जी नेहमी लपलेली असते ती आजकाल या ना त्या कारणाने समोर येते आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार Deputy Chief Minister Ajit Pawar यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजा मारणे याची भेट घेतली होती. यावरून बरंच राजकारण तापलं होतं. तर आता अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके MP Nilesh Lankay यांनी गजा मारणे Gajanan Marane याच्याकडून थेट सत्कार स्वीकारला आहे.
सध्या सोशल मीडियावर गजा मारणे आणि निलेश लंके यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येते आहे की नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी गुंड गजा मारणे याची भेट घेतली. यावेळी गजा मारणे यांनी निलेश लंके यांचा सत्कार करत असतानाचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे आता राजकारण चांगलंच तापलं आहे.
अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गजा मारण्याची भेट घेतली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून चांगलीच टीका करण्यात आली होती. तर आता निलेश लंके यांनी गजा मारनेची भेट घेतली यावरून आता शरद पवार नेमकं काय बोलतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागल आहे.
मराठवाड्यात वणवा ! भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या बाबतच्या ‘त्या’ आक्षेपार्ह्य पोस्टवरून अजूनही वातावरण तप्त