पिंपरी : पिंपरीमधील Pimpri नवी सांगवी मधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी 29 मे रोजी रात्रीच्या सुमारास टोळीयुद्धातून दीपक कदम Deepak Kadam या तरुणावर भीषण हल्ला करण्यात आला आहे. या तरुणाच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर गोळीबार Fairing करण्यात आला. या हल्ल्यात या तरुणाचा जागीच मृत्यू Murder झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्यामाहितीनुसार, ज्या तरुणाचा या गोळीबारामध्ये मृत्यू झाला तो दीपक कदम हा देखील रेकॉर्डवरील एक गुन्हेगार आहे. हे सविस्तर प्रकरण योगेश जगताप विरुद्ध गणेश ढमाले या टोळीतील वर्चस्व वाघाच्या लढाईतून सुरू झाले आहे. आतापर्यंत योगेश जगताप, रेहान शेख आणि आता दीपक कदम या तिघा जणांचा या टोळी युद्धातून मृत्यू झाला आहे.
धक्कादायक म्हणजे बुधवारी दीपक कदम हा त्याच्या रोजच्या सवयीप्रमाणे पान खाण्यासाठी म्हणून घराच्या बाहेर पडला. यावेळी तो सांगवी मधील सिद्धेश्वर फॅमिली शॉप येथे आला होता. यावेळी दोन जण दुचाकीवरून आले आणि दीपक कदम यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यांमध्ये दीपकच्या डोळ्यात आणि पाठीवर गोळी लागली आहे. या हल्ल्यानंतर दीपकचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे घटना परिसरापासून पोलीस स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर आहे.
घडलेली घटना अत्यंत भीषण आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू असलेल्या सध्याच्या घटनांमुळे नागरिक अक्षरशः धास्तावले आहेत. टोळीयुद्ध, अपघात या सगळ्यातून पुणे सारख्या सांस्कृतिक शहराची सुटका होऊ शकेल का ? असाच प्रश्न आता नागरिकांना पडला आहे.