मुंबई : मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मुंबई मध्य रेल्वे ठाणे स्थानकामध्ये 63 तासांचा मेगाब्लॉक Megablock घोषित करण्यात आला आहे. हा मेगा ब्लॉक दोन जून पर्यंत चालणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सीएसएमटी CSMT येथील प्लॅटफॉर्म विस्ताराच्या कामासाठी हा मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे अर्थातच मुंबईकरांना पुढचे 63 तास त्रास सहन करावा लागणार आहे. शुक्रवारी 30 मे रोजी मध्यरात्री बारा वाजल्यापासून ते रविवारी दोन जून दुपारी तीन वाजेपर्यंत ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक मध्य रेल्वेने घोषित केला आहे. या वेळेमध्ये 956 लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.
त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CSMT स्थानकामध्ये देखील 36 तासांचा ब्लॉक घोषित करण्यात आला असून शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजता हा ब्लॉग सुरू होणार असून दोन जून रोजी दुपारी साडेबारापर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे. सीएसएमटी येथील प्लॅटफॉर्म विस्ताराच्या कामासाठी हा मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. या मेगाब्लॉक दरम्यान सीएसएमटी स्थानकावरील फलाट क्रमांक 10 आणि 11 वर 24 डब्यांच्या गाड्या थांबवण्याच्या अनुषंगाने फलाटाची लांबी वाढवली जाणार आहेत अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.