छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर मधून एक धक्कादायक घटना घडली आहे. पोपट वाहुळ (वय वर्ष 28) आणि प्रकाश वाहूळ (वय वर्ष 26 ) या दोघांनी थेट आपल्या जन्मदात्या पित्यावरच धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची हत्या Murder केली आहे.
संपत लक्ष्मण वाहूळ (वय वर्ष 48) यांचा या भयावहल्यामध्ये मृत्यू झाला आहे. लग्न करू देत नाहीत आणि शेतीतही वाटा देत नाहीत म्हणून दोन्हीही भावांनी वडिलांवर हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये उपचार सुरू असताना संपत वाहूळ यांचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संपत वाहुळ हे वडगाव कोल्हाटी येथील रहिवासी असून त्यांना पोपट वाहुळ (28) व प्रकाश वाहुळ (26) हे दोन मुले आहे, वाहुळ यांच्या नावावर शेती आहे. तर दोन मुले खाजगी कंपनीत काम करतात. दि 8 मे रोजी रात्री 7:30 वाजेच्या सुमारास संपत वाहुळ हे एकटे घरी होते. लहान मुलगा प्रकाश हा कंपनीतून घरी येताच वडिलाला शिवीगाळ करू लागला, वडिलाने विरोध केला असता त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. मोठा मुलगा पोपटही त्यावेळी घरी आला असता. त्यानेही मारहाण करण्यास सुरुवात केली. दोघेही मारहाण का करताय विचारले असता आमचे लग्न करुन देत नाही आणि शेतीही वाटून देत नाही असे म्हणत मोठ्या मुलाने चाकूचे वार केले.
यावेळी संपत वाघूळ यांनी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. आरडा ओरड झाल्याने संपत वाहुळ यांचे भाऊ रामनाथ वाहुळ, संजय वाहुळ, आकाश व संदीप वाहुळ हे मदतीस धाऊन आले. संपत वाहुळ यांना घाटी दवाखान्यात दाखल करण्यात आले. याप्रकरणी दोन्ही मुलांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपचार सुरू असतांना दि. 23 मे रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पुढील तापास पोलीस करत आहे.