मुंबई : शिवसेना Shivsena उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दक्षिण मुंबईचे माजी विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ Pandurang Sakpal यांचे आज निधन झाले. ते 61 वर्षाचे होते. काही दिवसांपासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज संध्याकाळी गिरगाव मधील चंदनवाडी स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पांडुरंग सपकाळ हे ठाकरे कुटुंबीयांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. शिवसेनेमध्ये आलेल्या अनेक वादळांमध्येही त्यांनी न डगमगता ठाकरेंची साथ कधीही सोडली नाही.
शिवसेनेतील सर्वच नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. संजय राऊत यांनी देखील ट्विट करून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पांडुरंग सकपाळ
धग धगता कडवट शिवसैनिक.
दक्षिण मुंबई गिरगाव भागात त्याने विभाग प्रमुख म्हणून कार्याचा ठसा उमटवला.अनेकआंदोलनात पोलिसांचामार खाल्ला.तुरुंगभोगला.
पणपांडुरंग मागे हटलानाही. पांडू म्हणूनच तो लोकप्रिय होता.
असाझुंजार पांडू आम्हाला सोडूनगेला.
विनम्र श्रद्धांजली.