नागपूर : नागपूरमध्ये Nagpur सात डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशनाला Winter Session सुरुवात झाली आहे. अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी पासूनच मराठा आरक्षण Maratha Reservation, धनगर आणि ओबीसी आरक्षण Dhangar and OBC reservation, नैसर्गिक आपदा Natural Disasters, ड्रग्स प्रकरण Drug case असे मोठे मुद्दे चिघळणार याची कल्पना होती. परंतु यामध्ये नवाब मलिक Nawab Malik यांचा एक प्रश्न आता अधिक प्रखर बनला आहे. काल पहिल्याच दिवशी हिवाळी अधिवेशनासाठी नवाब मलिक हे विधानसभेत दाखल झाले. त्यानंतर नवाब मलिक हे शरद पवारांच्या गटांमध्ये जाणार की अजित पवारांच्या गटांमध्ये जाणार यावर चर्चा सुरू असतानाच त्यांनी थेट सत्ताधाऱ्यांच्या बाकावर जाऊन बसल्याने त्यांनी अजित पवारांना आपला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट झालं होतं.
दरम्यान त्यांच्या या कृतीनंतर विधानसभेत नव्या वादाला पेव फुटला. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक खणखणीत पत्र लिहून नवाब मलिक यांना युतीमध्ये स्थान देऊ नये. त्यांच्यावरील आरोप जोपर्यंत खोटे ठरत नाहीत तोपर्यंत पक्षाने त्यांना स्थान देऊ नये. अशी विनंती केली होती. या पत्रानंतर राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणावर ढवळले गेले आहे.
नवाब मलिक यांच्या विषयावर उपमुख्यमंत्री अजित पवार आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष असतानाच माध्यमांनी आज अजित पवारांना घेरल्यानंतर पवारांनी संताप व्यक्त केला. त्या पत्राचं काय करायचं ते मी करीन ! अशा थेट शब्दात अजित पवारांनी आपला संताप व्यक्त केला. यावरून एकंदरीतच फडणवीस आणि पवार यांच्यामध्ये सर्व काही अलबेल नसल्याचं दिसून येत आहे. एकीकडे नवाब मलिक यांच्या वरून विधानसभेत गदारोळ सुरू असतानाच आता तपास यंत्रणांनी देखील कान टवकारले आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण
नवाब मलिक यांना गोगावला कंपाउंड मधील मनी लॉन्ड्री प्रकरणी ईडीने अटक केली होती. २३ फेब्रुवारी 2022 पासून नवाब मलिक हे जेलमध्ये होते. दरम्यान त्यांनी सातत्याने आपल्या प्रकृतीचे कारण देऊन जामिनाची मागणी केली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ऑगस्टमध्ये अटी आणि शर्तीसह 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. या अटींमध्ये साक्षीदारांना धमका होऊ नये, घराचा पत्ता, मोबाईल नंबर द्यावा, पासपोर्ट जमा करावा, मीडियाशी बोलू नये आणि गुन्हेगारी कृत्यात सहभागी होऊ नये या अटी घालण्यात आल्या होत्या. परंतु सातत्याने आपल्या प्रकृतीचे कारण देऊन जामीन मिळवलेले नवाब मलिक आता थेट विधानसभेत जाऊन पोहोचल्यानंतर तपास यंत्रणांनी देखील त्यांचा जामीन ना मंजूर व्हावा यासाठी हालचाली सुरू केल्या असल्याचे समजते आहे. त्यामुळे आता नवाब मलिक यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.