विधानपरिषद निवडणुक : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections 2024 पार्श्वभूमीवर शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. 10 जूनला शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक Teacher and graduate constituency elections पार पडणार होती. आता, या निवडणुकीसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून 2 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे.
विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुकांची घोषणा आता करण्यात अली असून आता येत्या 26 जूनला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी 31 मे 7 जून पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात अली आहे. त्यामुळे इच्छुकांनी आपले अर्ज 31 मे 7 जून दरम्यान दाखल करायचे आहेत. तर 10 जून रोजी अर्जाची छाननी होणार आहे. यानंतर 12 जूनपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत देण्यात आली असून 26 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. 1 जुलै रोजी होणार मतमोजणी होणार आहे.