Beauty Tips : त्वचा स्वच्छ करण्यासाठी स्क्रबिंग Scrubbing खूप गरजेचं आहे. यामुळे मृत त्वचा Dead skin निघून जाते. चेहरा स्क्रब करण्यासाठी महिला महागड्या उत्पादनांचा वापर करतात. त्यामध्ये असलेल्या केमिकल्समुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्याही उद्भवू शकतात. नैसर्गिक गोष्टींनी चेहरा स्क्रब करणे चांगले. साखर वापरून तुम्ही घरी अनेक प्रकारचे स्क्रब बनवू शकता. हे चेहऱ्यावर लावल्याने तुमची त्वचा स्वच्छ होईल.
लिंबू आणि साखर स्क्रब Lemon and sugar scrub
लिंबू त्वचा स्वच्छ करण्यास मदत करते. याच्या वापराने स्किन टॅनची समस्याही दूर होते. स्क्रब बनवण्यासाठी एका छोट्या बाऊलमध्ये एक चमचा साखर मिसळा. त्यात लिंबाचा रस घाला. त्यात थोडे मध घालावे. आता हलक्या हातांनी चेहऱ्याला मसाज करा. काही वेळाने पाण्याने धुवून टाका.
ग्रीन टी आणि शुगर स्क्रब Green tea and sugar scrub
ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात. हे चेहऱ्यावर लावल्याने मुरुम कमी होण्यास ही मदत होईल. यापासून स्क्रब बनवण्यासाठी एका छोट्या बाऊलमध्ये ग्रीन टी घ्या, त्यात एक चमचा साखर घाला. या मिश्रणात ऑलिव्ह ऑईल घालून चांगले मिक्स करावे. आता ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि साधारण २० मिनिटांनी धुवून टाका.
हळद आणि साखर Turmeric and sugar
हळदीचा वापर केल्यास मृत त्वचेपासून आराम मिळतो. यापासून स्क्रब बनवण्यासाठी एका छोट्या बाऊलमध्ये एक चमचा हळद पावडर, एक चमचा साखर आणि एक चमचा मध मिसळा. चांगले मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.
टोमॅटो आणि साखर Tomatoes and sugar
टोमॅटो आणि शुगर स्क्रब बनविणे अगदी सोपे आहे. ते बनवण्यासाठी टोमॅटोच्या रसात साखर मिसळा, आता संपूर्ण चेहऱ्यावर स्क्रब करा. काही वेळाने पाण्याने धुवून टाका.