नागपूर : यंदाच्या हिवाळी अधिवेशनाला Winter Session नागपूरमध्ये Nagpur आजपासून सुरवात होते आहे. महाराष्ट्रातील सध्याच राजकीय वातावरण पाहता हे अधिवेशन वादळी होणार यात शंका नाही. दरम्यान आज पहिल्याच दिवशी गटातटाचे राजकारण पाहायला मिळाले. अर्थात गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार नवाब मलिक Nvab Malik कोणत्या गटात सामील होतात यावर तर्क वितर्क लढवले जात होते. यावर आता स्वतः नवाब मलिक यांनी पूर्ण विराम लावला आहे. आमदार नवाब मलिक यांनी सभागृहात प्रवेश केलाय नंतर अजित पवार गटात सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसून आपला पाठिंबा अजित पवारांना असल्याचे एक प्रकारे जाहीर केले.
यंदाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. राज्याची उपराजधानी नागपुर येथे हे अधिवेशन होत आहे. त्यामुळे पुढेचे 10 दिवस राज्याचं लक्ष नागपूरकडे लागले आहे. या अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून खडाजंगी होणार यात शंका नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी आजपर्यंत आपली स्पष्ट भूमिका सांगितली नसल्याने ते कोणत्या गटात सामील होणार यावर चर्चा सुरु होती. दरम्यान नवाब मलिक जसे सभागृहात दाखल झाले. त्यांनी अनिल देशमुख यांची भेट घेतल्यानंतर सत्ताधारी अजित गटात पवार यांच्या गटात शेवटच्या बाकावर जाऊन बसले आहेत. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात हजेरी दिल्याचे समजले जाते आहे.