चेन्नई : मिचोंग चक्रीवादळाने Cyclone Michong तमिळनाडूचं प्रचंड नुकसान केल आहे. हे वादळ आता शांत झाल असलं तरीही मागे अत्यंत वाईट आठवणी ठेवून गेले आहे. सामान्य नागरिकांचं अतोनात नुकसान झाले आहे. याचे अनेक धक्कादायक आणि दुःखद फोटो देखील समोर आले आहेत. दरम्यान या मिचोंग चक्रीवादळाने सुपरस्टार रजनीकांत Superstar Rajinikant यांच्या घराला देखील सोडलं नाहीये. सुपर डुपर स्टार रजनीकांत यांचे घर चेन्नईमध्ये गार्डन परिसरात आहे. या परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.
सुपरस्टार रजनीकांत यांच्या कुटुंबियांना देखील मिचोंग चक्रीवादळाने घराबाहेर पडणे कठीण केल आहे. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये आपण पाहू शकतो की रजनीकांत यांच्या घराच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे .
मोचोंग चक्रीवादळानंतर देखील आता दोन दिवस उलटून गेले आहेत. पण जसे हे चक्रीवादळ आले तसे मोठ्या प्रमाणावर बरसणारा पाऊस त्याचबरोबर सोसाट्याचा वारा यामुळे तमिळनाडू जलमय झाले आहे. नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सध्या राज्य सरकार या नैसर्गिक आपदे मधून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत.