मुंबई : अभिनेत्री पूनम पांडेचे POONAM PANDEY काल निधन झाले. अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वरून तिच्या पीआरटीमने ही माहिती दिली होती. सर्वाइकल कॅन्सरमुळे पूनम पांडेचे निधन झाले असं सांगण्यात येत होतं. तर आज पुन्हा स्वतःच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून मी जिवंत आहे. असं तिने स्वतःच पुन्हा जाहीर केल आहे. त्यामुळे अर्थातच हा पब्लिसिटी स्टंट होता. ज्यास पूनम पांडे सर्वाइकल कॅन्सरच्या Cervical Cancer जनजागृतीसाठी केलेला प्रयत्न म्हणत आहे.
खरंतर ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तिच्या मृत्यूबाबत शंका व्यक्त केलीच होती. याआधीही अनेक वादग्रस्त विधान आणि कृतींमुळे पूनम पांडेचे नाव कुप्रसिद्ध आहेच. त्यात आता या नवीन स्टंटची भर पडली आहे.
https://www.instagram.com/reel/C24C_LyIy6m/?utm_source=ig_web_copy_link
खरंतर सर्वाइकल कॅन्सरच्या जनजागृतीसाठी प्रयत्न करणं हे एक चांगलं काम आहे. तिने तिच्या पोस्टमध्ये देखील हे लिहिला आहे की, अनेक महिलांना सर्वाइकल कॅन्सरविषयी योग्य माहिती नसल्याकारणाने मृत्यू देखील ओढावत आहे. परंतु जनजागृतीची ही पद्धत तिला पुढे त्रासदायक ठरू शकते. अर्थात पूनम पांडेचा यापुढे लांडगा आला रे आला ! असे होऊ नये म्हणजे झालं.
Poonam Pandey Passes Away : पूनम पांडेच्या निधनाची बातमी खरी की खोटी ? युजर्स उपस्थित करत आहेत ‘हे’ प्रश्न