पुणे : पुणे अपघात प्रकरणामध्ये आता एक मोठी बातमी समोर येते आहे. पोलिसांनी अपघात झाला त्या रात्री वेदांत अग्रवाल याला अटक केली होती. परंतु वेदांत हा अल्पवयीन असल्याकारणाने नियमानुसार त्याचे वडील विशाल अग्रवाल याच्यावर गुन्हा दाखल झाला होता आज सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली असून विशाल अग्रवाल याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान पोलिसांनी वेदांत अग्रवाल याचे वडील विशाल अग्रवाल आणि इतर तिघांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यामध्ये बारचालक जितेश शेवणी आणि जयेश बोनकर यांना देखील ही कोठडी सुनावण्यात आली आहे.
आज विशाल अग्रवाल याला सत्र न्यायालयात आणण्यात आलं. यावेळी त्याच्यावर शाही फेक करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलाय. दरम्यान आजच्या युक्तीवादामध्ये पोलिसांनी म्हटले आहे की, ” वेदांतला त्याचे वडील विशाल अग्रवाल याने पार्टीसाठी परवानगी दिली होती. तसेच गाडीला परवाना नसताना देखील गाडी देखील चालवायला दिली. त्याचबरोबर जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा विशाल अग्रवाल हा पुण्यात होता. मात्र विशाल अग्रवाल पुण्यात नसून बाहेर असल्याचे सांगण्यात येत होतं. फरार विशाल अग्रवाल याला अखेर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथे अटक केली आहे.
गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करायचा आहे. मोबाईल तपास करून जप्त करायचा आहे. त्यामुळे विशालची सात दिवसांची कोठडी देण्यात यावी अशी मागणी पोलिसांनी कोर्टात केली होती. परंतु कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी आता विशाल अग्रवाल याला सुनावली आहे.
https://www.facebook.com/share/v/mvbqVvKuPvG7TXLo/?mibextid=qi2Omg