सोन्याचे आजचे दर : हिंदू मान्यतेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अक्षयतृतीया म्हणजे आजच्या दिवशी जी वस्तू घरामध्ये खरेदी करून आणली जाते ती घरामध्ये अक्षय राहते. त्यामुळे आज ग्राहकांचा सोनेरी खरेदीकडे अधिक कल असल्याच दिसून येत आहे.
सोन्याच्या किमतींनी उच्चांक गाठला असला तरीही आज तुम्ही सोने खरेदीचा नक्कीच प्लॅन करत असणार. तर मग आज दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर आहे 71 हजार 350 रुपये, थोड्या प्रमाणावर आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. काल सोन्याचा दर हा 71 हजार 600 रुपये होता. तर चांदीचा दर आज 83,040 रुपये प्रति किलो आहे.
आज जर तुम्ही दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 22 कॅरेट सोन्याचा दर आज दहा ग्रॅम साठी 65 हजार 285 रुपये आहे.