मुंबई : यावर्षी लोकसभा निवडणुका Lok Sabha Elections प्रचंड गाजल्या आहेत. पक्षांतर म्हणा किंवा पक्ष फोडीच राजकारण म्हणा या सर्व प्रकरणानंतर आता जनता नेमकी कौल कोणाला देते याकडे आता देशाचं लक्ष लागलं आहे. एक्झिट पोलच्या Exit Polls दाव्यानुसार नरेंद्र मोदी Narendra Modiपुन्हा एकदा पंतप्रधान होणार असं म्हटलं जात असतानाच निवडणूक आयोगाने Election Commission महत्त्वाची पत्रकार परिषद बोलावली आहे.
निकालाच्या एक दिवस आधी निवडणूक आयोगानं अशा प्रकारची पत्रकार परिषद बोलवली आहे. निकाल लागल्यानंतर पत्रकार परिषद बोलणं ही गोष्ट सामान्य आहे. पण या पत्रकार परिषदेमुळे आता अनेकांना नेमका विषय काय असा प्रश्न पडला आहे. दरम्यान लोकसभा निवडणूक 2024 यासंदर्भात निवडणूक आयोगाने ही पत्रकार परिषद बोलावली असून काही वेळातच हे पत्रकार परिषद सुरू होते आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…