मुंबई : आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या मार्गावर पालघरजवळ मालगाडीला अपघात Accident झाला आहे. या अपघातामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या मालगाडीचे डबे बाजूला करण्याचं काम रेल्वे प्रशासन करते आहे. ही मालगाडी गुजरात होऊन मुंबईकडे येत होती. दरम्यान पालघरजवळ अपघात झाल्याने डबे पलटी झाले आहेत. यामुळे ट्रॅक नंबर एक आणि दोन प्रभावीत झाले असून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे काही काळासाठी ठप्प होण्याची शक्यता आहे.
या अपघातामध्ये रेल्वेचे देखील मोठे नुकसान झालं आहे. तर या मालगाडीमध्ये जे सामान वाहिले जात होते या सामानाचा देखील मोठ नुकसान झाल आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.