पुणे : पुण्यातील पिंपरी चिंचवड Pimpri Chinchwad भागातून दहशतवाद विरोधी पथकाने Anti-terrorism squad पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. गुप्त बातमीदारांनी दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने पथकाने तपास करून या पाच जणांना बनावट कागदपत्रांसह ताब्यात घेतल आहे.
या कारवाईमध्ये शमीम नुरोल राणा, राज उर्फ सम्राट सदन अधिकारी, जलील नरू शेख उर्फ जलील नूर मोहम्मद गोलदार ,वसीम अजीज उलहक मंडल उर्फ वसीम अजीऊल हक हिरा, आझाद शमशुल शेख उर्फ अबुल कलाम शमशुद्दिन फकीर या पाच जणांना दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. हे पाच जण बनावट आधार कार्ड, जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट अशी बनावट कागदपत्र बाळगून होते.
पोलिसांनी या आरोपींकडून सिम कार्ड, मोबाईल हे साहित्य जप्त केले असून परकीय नागरिक कायदा पारपत्र अधिनियम आणि भारत देश प्रवेश करण्याचा नियम यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या पाच जणांचा देशात राहण्याचा कोणता घातपाताचा उद्देश तर नव्हता ना याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.