मुंबई : बिग बॉसचा Bigg Boss विनर ठरलेला कॉमेडियन मुन्नावर फारुकी Munnawar Farooqui यांन नुकतंच गुपचूप पणे दुसरे लग्न केल आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार मुन्नावर फारुकीने second Marriage महजबीन कोतवाल हिच्याशी लग्न केलं आहे. परंतु याबाबत या दोघांनीही स्वतः कोणतीही अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, 26 मे रोजी मुंबईमध्येच या दोघांनी लग्न केलं. महजबिन कोतवाल ही एक मेकअप आर्टिस्ट आहे. तसेच मेहेजबीला एक दहा वर्षाची मुलगी देखील आहे. तिचा पहिला निकाह तुटला होता. डिवोर्स नंतर ती तिच्या मुलीसोबत राहते. तर तिच्या मुलीचं नाव समायरा असे आहे.
https://www.instagram.com/p/CIiUd9pFGEP/?utm_source=ig_web_copy_link
मुन्नावरने पहिलं लग्न हे जास्मिन नावाच्या मुलीशी केलं होतं. या दोघांना एक मुलगा आहे. मुन्नावर हा एक उत्कृष्ट कॉमेडियन तर आहेच. तो त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तर चर्चेत असतोच पण बऱ्याच वेळा त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील चर्चेला देखील नेहमी पेव फुटलेले असते.