पुणे : सध्या जुन्या महामार्गावरून मुंबईला जाण्यासाठी चार ते पाच तासांचा प्रवास करावा लागतो सध्या हा मुंबई पुणे एक्सप्रेस वे सहा पदरी असून हा मार्ग आता आठ पदरी करण्यात यावा असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर वाहनांची संख्या पाहता सध्या सहा पदरी असलेला मार्ग आठ पदरी करण्यात यावा यासाठी बोरघाट मध्ये आणखीन दोन बोगदे करण्यात येणारा असून यासाठी सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचा खर्चाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सुपूर्त करण्यात आला आहे. या प्रस्तावावर येत्या वर्षा अखेरीस मंजुरी येईल, अशी अपेक्षा राज्य रस्ते विकास महामंडळाने व्यक्त केली आहे.
पुण्याहून मुंबईकडे अथवा मुंबईकडून पुण्याकडे येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी तर होतच असते तसेच या मार्गावरून प्रवास करताना चार ते पाच तासांचा कालावधी लागतो . यासाठी रस्ते विकास महामंडळाने मिसिंग लिंक हा प्रकल्प सुरू केला आहे.
एक्सप्रेस वे ची वाहनांची क्षमता साठ हजार आहे. वास्तविक पाहता दर दिवशी या मार्गावरून 82 ते 83 हजार वाहने धावतात त्यामुळे भविष्यात होणाऱ्या वाहतूक कोंडी लक्षात घेऊन राज्य सरकारने एक्सप्रेस वे आठ पदरी करण्याचा निर्णय घेतला आहे.