पुणे : पुण्यात पोर्शे कारने तो एक अपघात Pune Accident Case केला पण त्यानंतर धनीक, धनिकांचे पुत्र यांचेच नाही तर ससून Sasoon मधील देखील मोठे गौडबंगाल आता उघड होण्याची दाट शक्यता आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, ससून मधील रक्त तपासणी विभागातील तो संशयित कर्मचारी नॉट रिचेबल झाला आहे.
पुणे पोलीस या कर्मचाऱ्याचा सध्या कसून शोध घेत आहेत. कालच ब्लड सॅम्पल अदलाबदली केल्याप्रकरणी फॉरेन्सिक विभागाचे डॉक्टर तावरे, श्रीहरी हळनोर अटक करण्यात आली आहे . त्यानंतर तावरे यांनी मी सगळ्यांची नाव सांगणार अशी थेट धमकीच दिली. त्यामुळे एकंदरीतच मोठ गौडबंगाल समोर येणार आहे यात शंका नाही.
या प्रकरणातील हा कर्मचारी बेपत्ता नसल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला पुणे पोलीस या कर्मचाऱ्यांचा शोध देखील घेत आहेत. सध्या पोलिसांकडून ससून मधील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाते आहे. त्या दिवशीच्या सीसीटीव्ही फुटेजच्या CCTV आधारे ससून मधील अनेकांना चौकशीला बोलवलं जाऊ शकतं. दरम्यान हे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण पुण्यातील अनेक खुफिया गुन्ह्यांना उघड करते आहे.