पुणे : वाघोलीत Wagholi सोमवारी रात्री उशिरा भरदाव वेगात असणाऱ्या ट्रकने दोघा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चिरडल Pune Accident आहे. या दोन्हीही विद्यार्थ्यांचा या अपघातामध्ये मृत्यू Death झाला आहे. याप्रकरणी ट्रक चालक श्यामबाबू रामफळ गौतम याला पोलिसांनी अटक केली.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पुण्यातील वाघोलीतून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या एमएच बारा व्ही एफ 64 41 जकात नाका चौकात सिग्नलवर देखील आपला वेग कमी केला नाही. या चौकात एका दुचाकीवर तिघे विद्यार्थी बसलेले होते. त्यांच्या वाहनाला या ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये हे तिघेही विद्यार्थी अक्षरशः फरपटत गेले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. या अपघातामध्ये तिघांपैकी दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे.
या अपघातात आदिल शेख असं एका विद्यार्थ्याचं नाव होतं अशी माहिती मिळाली असून हे विद्यार्थी मूळ लातूरचे होते. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतल असून पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक या वाहन चालकांना राहिला आहे की नाही असाच प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत.