नागपूर : “पिंपरी-चिंचवडमधील तळवडे येथे केकवरील फायर कँडल Talwade Fire Incident बनविण्याच्या कारखान्याला भीषण आग लागली होती. हि आग भीषण स्वरूपात लाग लागल्याने बचाव करण्यापूर्वीच ७ जणांचा होरपळून दुर्दैवी अंत झाला. हा घटनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखल घेतली आहे. दरम्यान या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत. तर मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले.
या वेळी उपमुख्यमंत्री यांनी शोक व्यक्त करताना म्हंटले कि, ” आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. मी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करतो. दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जातील,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड मधील दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या घटनेची दखल घेतली. मुख्यमंत्री म्हणाले कि, पिंपरी चिंचवडमधील तळवडे येथील स्पार्कल कँडल बनवणाऱ्या कारखान्याच्या आग दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. दुर्घटनेतील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.