मुंबई : येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये Ayodhya प्रभू श्रीरामांची Shriram प्रतिष्ठापना होणार आहे. यासाठी अयोध्येमध्ये जय्यत तयारी सुरु असून या सोहळ्यासाठी कोना कोणाला आमंत्रण मिळाले किंवा नाही मिळाले यावरून देखील वादंग निर्माण झाला आहे. दरम्यान महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना आमंत्रण देण्यात आले नाही . त्यामुळे हा सोहळा भारतवासीयांसाठी नसून राजकीय आहे आणि विशिष्ठ पक्षाचा हा कार्यक्रम आहे अशी टीका संजय राऊत यांच्यापासून केली गेली होती . दरम्यान आज पुन्हा त्यांनी राम मंदिर मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रभू रामाला उमेदवार घोषित करणे एवढेच भाजपकडून बाकी आहे. अशी टीका त्यांनी पंतप्रधानांवर केली आहे.
संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींच्या अयोध्या दौऱ्यावरून हि टिका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, “आता 22 जानेवारीला भाजप घोषणा करेल की आम्ही प्रभू श्रीरामांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवत आहोत, एवढंच उरलं आहे. रामजींच्या नावावर इतकं राजकारण सुरू आहे की, आमचा उमेदवार श्रीरामच असेल एवढंच म्हणावं लागेल. “
प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, ठाकरे नक्की जातील, पण भाजपचा कार्यक्रम संपल्यानंतरच ते जातील. हा राष्ट्रीय कार्यक्रम नाही. या कार्यक्रमासाठी भाजप अनेक सभा आणि प्रचार करत आहे, पण त्यात पावित्र्य कुठे आहे. “